Latest Posts

मतदार जनजागृतीसाठी व्होटेथॉन दौडचे आयोजन

– वोट नागपूर वोट लोगोचे अनावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : येत्या २० नोव्हेंबर ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, याकरिता सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात स्वीप कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे मतदार जनजागृतीसाठी व्होटेथॉन दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौडच्या वोट नागपूर वोट लोगोचे नागपूरचे निवडणूक निरीक्षक संतोषकुमार मिश्रा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, साप्रविचे अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर व अनंत नागमोते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार स्वीप अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा मतदार जनजागृती करिता शनिवार, ९ नोव्हेंबर ला सकाळी ६ वाजता, धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे व्होटेथॉन मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणी झुम्बा, डान्स, रनींग, फन वॉक, फॅन्सी ड्रेस आदी विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

Latest Posts

Don't Miss