Latest Posts

वनरक्षकाविरूध्द नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने केली सापळा कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मौजा मायवाडी येथील तक्रारदार यांनी शेतकऱ्याच्या शेतामधील शासकीय नियमाप्रमाणे वन विभागाकडून परवानगी घेवून सागवान झाडे कटाई केलेले लाकुड रूपये ४० हजार मध्ये विकत घेण्याच्या सौदा केलेला असून वन विभागाकडील संपुर्ण परवानगी घेण्याकरिता तक्रारदारास शेतमालकाने अधिकार दिलेला असतांना शेतातील सागवान लाकुड ट्रॅक्टरमध्ये भरून घरी आणण्यापुर्वी वन विभाग नरखेड जिल्हा नागपूर परिक्षेत्र अंतर्गत वडविरा बिटचे वनरक्षक मच्छिंन्द्र वासुदेव मोहटे यांच्याकडून लाकुड उचल करतेवेळी पंचनामा करणे आवश्यक असल्याने तो पंचनामा करून सागवान लाकडाची वाहतुक करण्याची परवानगी देण्याकरिता आलोसे मच्छिंन्द्र वासुदेव मोहटे पद वनरक्षक यांनी ५०० रू. व यापुर्वी केलेल्या पंचनाम्याचे ३ हजार रू. असे एकुण ३ हजार ५०० रू. लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती १ हजार ५०० रू. लाच रक्कम स्विकारल्याचे आलोसे मच्छिंन्द्र वासुदेव मोहटे (५२) पद वनरक्षक, वन परिक्षेत्र नागपूर नरखेड बिट वडविरा यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आले आहे.

नमुद आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन जलालखेडा, नागपूर ग्रामिण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आलोसे यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली हेमंतकुमार खराबे, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि नागपूर यांचे पर्यवेक्षनात पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, पोहवा पंकज घोडके, नापोशि महेश सेलोकर, पोशि सचिन किन्हेकर, नापोशि शारीक अहमद सर्व नेमणुक ला.प्र.वि. नागपूर यांनी केलेली आहे.

Latest Posts

Don't Miss