Latest Posts

वैनगंगा नदीत नाव उलटली : सहा महिला बुडाल्या

– एका महिलेचे प्रेत मिळाले, पाच जणी बेपत्ता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली नाव पाण्यात बुडाल्याने ६ महिला वाहून गेल्याची घटना आज २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत एका महिलेचे प्रेत मिळालेले असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे.

सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सात महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघून गेले व एका महिलेला वाचविण्यात आले. परंतु सहा महिला बुडाल्या. यापैकी एका महिलेचे प्रेत मिळाले असून पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे. सविस्तर वृत्त काही वेळातच प्राप्त होईल.

Latest Posts

Don't Miss