Latest Posts

प्रभाग क्र १६ मध्ये होणार विकास कामे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : स्थानिक नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकास कामे होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांची मागील काही दिवसांपासून आपल्या प्रभागात बुद्ध विहार, सभा मंडप तसेच आदी विकास काम करण्याची मागणी होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेटून धरून निधी खेचून आणल्या. नागरिकांची मागणी लक्षात घेता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिल्याने याठिकाणी विविध विकास कामे केली जाणार आहेत.

नुकतेच प्रभाग क्रमांक १६ मध्ये जाऊन भाग्यश्री आत्राम यांनी या विविध विकास कामांचे भूमिपूजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक अमोल मुक्कावार, नारायण बोरकुटे, आनंदराव सुनतकर, अरुण रामटेके, मोहन कांबळे, राजेश्वर सुनतकर, अमोल रामटेके, राजू कोंडागुर्ले, विजय सुनतकर, राजेश रामटेके, रवींद्र बोरकुटे आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss