विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : येथील वर्धा नदीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. नंदकिशोर ऋषी शेंडे (३७) गांधी वॉर्ड बल्लारपूर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
काल १९ जानेवारी रोजी ११.३० वाजताच्या सुमारास नंदकिशोर ऋषी शेंडे हा युवक येथील शमशान घाट जवळील घाटावर गेला होता. तो आत्महत्या करण्याकरिता आपली चपल काढून नदीत उतरून चालत होता. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो खोल पाण्यात डूबला. काल त्याचा शोध घेतला असता तो मिळाला नाही. आज त्याचे प्रेत मिळाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी भेट दिली.
पोलीसांनी मृतकाचे पंचनामा करून शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पो.अं. प्रकाश मडावी करीत आहे.