Latest Posts

पत्नीची हत्या करून शरीराचे केले २०० तुकडे : मित्राला विल्हेवाटीसाठी दिले पैसे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / लंडन (London) : नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचीच पुनरावृत्ती ब्रिटनमध्ये घडली आहे. एका २८ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे २०० हून अधिक तुकडे केले.

मित्राला पैसे देऊन त्याच्या मदतीने या तुकड्यांची विल्हेवाट लावली. त्याला आता जन्मठेप भोगावी लागणार आहे.

लिंकनशायर येथील आरोपी निकोलस मेटसनने शुक्रवारी २६ वर्षीय पत्नी होली ब्रॅमली हिच्या हत्येची कबुली दिली. मेटसनने बेडरूममध्ये त्याच्या पत्नीवर अनेक वेळा वार केले. यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेला. तेथे त्याने २०० हून अधिक तुकडे केले. ते तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत आठवडाभर स्वयंपाकघरात ठेवले.

दरम्यान, त्याने आपल्या मित्राला तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ५० पौंड (सुमारे ५ हजार रुपये) दिले. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीला विथम नदीत प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसल्याने बिंग फुटले. पाणबुड्यांना महिलेच्या मृतदेहाचे २२४ तुकडे सापडले. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

Latest Posts

Don't Miss