Latest Posts

हिवाळी सत्र परीक्षेला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात : परीक्षा केंद्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस २६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत पदवी परीक्षेचे १ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे वितरित केली आहेत.

त्याच बरोबर ऐनवेळेस काही परीक्षा केंद्रात बदल झाल्यास किंवा विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र तात्काळ समजण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे.

विद्यार्थ्यांनी त्याच्या लॉगिन मध्ये पीएनआर टाकल्यास त्याला त्याची परीक्षा, त्याचा आसन क्रमांक व परीक्षा केंद्र याची त्याला तात्काळ माहिती मिळते. तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्रात काही दुरूस्ती असल्यास विद्यार्थी महाविद्यालयास संपर्क साधून सुधारित प्रवेशपत्र प्राप्त करून घेऊ शकतो. विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र व इतर माहिती विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर मिळेल.

Latest Posts

Don't Miss