Latest Posts

संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार : केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : लोकसभेचे १८ वे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संयुक्त अधिवेशन होणार आहे.

जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हे अधिवेशन होणार आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्य संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे.

Latest Posts

Don't Miss