Latest Posts

महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मिस चंद्रपूर अल्का मोटघरे यांची निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या स्पर्धेत चंद्रपूर च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये मिस चंद्रपूर म्हणून अल्का मोटघरे यांची निवड झाली.

चंद्रपूर येथील गांधी चौकातील महानगर पालिका च्या पटांगणात १० मार्च रोजी बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केले होते. त्यात गॉड पॉवर जिम च्या अल्का मोटघरे यांची मिस चंद्रपूर म्हणून निवड करण्यात आली.

अल्का मोटघरे उत्कृष्ट खेडाळु म्हणुन प्रसिद्ध यांनी यापूर्वी नॅशनल पॉवर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल आणि नॅशनल रोप स्किपिंग मध्ये मेडल जिंकले आहे तसेच रन फॉर युनिटी मध्ये १२ किलोमीटर अंतर चंद्रपूर मध्ये त्या एकमेव महिलेने पार केले होते.

Latest Posts

Don't Miss