Latest Posts

शिवलिंगपूर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील शिवलिंगपूर येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २९ ऑक्टोबर रोजी राजवाडा अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

गावाचा विकास करायचा असेल तर विद्यमान कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याशिवाय पर्याय नाही.एवढेच नव्हेतर भाग्यश्री आत्राम यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करण्यास इच्छूक असल्याचे सदर कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या ध्येय-धोरण आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दपट्टा टाकत व पुष्पगुच्छ देत ताईंनी स्वागत केले.

यावेळी शिवलिंगपूर येथील आकाश बोल्लूवार, विनीत मेंगनवार, चरण वर्धलवार, रवी मंगलारपवार, गणेश गुंतीवार, संतोष बोल्लूवार यांनी प्रवेश घेतला.

Latest Posts

Don't Miss