Latest Posts

जगातील दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : फटाक्यांचा धूर, प्रदुषण, धुरक्याने घुसमटणाया मुंबईचा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत नवी दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून मुंबई सहाव्या आणि कोलकाता सातव्या स्थानावर आहे.

मुंबईची हवेची गुणवत्ता निर्देशांक सध्या 157 असून दिल्लीतील हवा गुणवत्ता 407 आहे. कोलकाताची हवा गुणवत्ता 154 आहे.

असा असतो एअर क्वालिटी इंडेक्स –
हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स एक्यूआय तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत एक्यूआय अतिशय शुद्ध हवा मानली जाते.

51 ते 100 दरम्यान एक्यूआय- समाधानकारक हवा, 101 ते 200 दरम्यान एक्यूआय- मध्यम दर्जाची हवा, 201 ते 300 पर्यंत एक्यूआय- खराब हवा समजली जाते.

तर 301 ते 400 एक्यूआय- अतिशय खराब तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास हवेची स्थिती गंभीर असल्याचे मानले जाते.

हॉटस्पॉट – चेंबूर 338 एक्यूआय, बीकेसी 310 एक्यूआय, बोरिवली 306 एक्यूआय, मालाड 323 एक्यूआय, अंधेरी 172 एक्यूआय, वरळी 144 एक्यूआय, माझगाव 266 एक्यूआय, कुलाबा 209 एक्यूआय, भांडुप 148 एक्यूआय.

एक्यूआय – 0 ते 50 शुद्ध हवा, 51 ते 100 समाधानकारक हवा, 101 ते 200 मध्यम दर्जाची हवा, 201 ते 300 खराब हवा, 301 ते 400 अतिशय खराब

Latest Posts

Don't Miss