Latest Posts

योगाभ्यास आणि प्राणायाम हे मानवी जीवनासाठी निरोगी मार्ग : प्रेम कुमार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : योगाभ्यास आणि प्राणायाम हे मानवी जीवनासाठी निरोगी मार्ग आहेत असे ब्रदर प्रेम कुमार यांनी मोंटफोर्ट स्कूल बामणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रमत मार्गदर्शन करताना म्हणाले.

जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आज सकाळी ८ वाजता मोंटफॉर्ट स्कूल बामणी येथे शाळेच्या प्रांगणात सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी योग दिन साजरा केला. यावेळी शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार यांनी सांगितले की आधुनिक जीवनात भौतिक साधनांचे महत्व वाढले आहे. म्हणूनच मनुष्याला आपल्या शरीरात आरोग्याची काळजी घेणे कठीण होत आहे. या अत्यंत व्यस्त जीवनात मानवाची शारीरिक हालचाल ही एक समस्या बनली आहे. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. योग प्राणायाम व्यायाम करून, एक व्यक्ती आपले जीवन निरोगी मार्गावर नेऊ शकते, योगसाधना माणसाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतुलित ठेवण्याचे कार्य करते, आधुनिक जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे माणसाला आरोग्यासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा सर्व योग साधना व्यायाम प्राणायामचा मार्ग आहे.

यावेळी सर्व शिक्षकांनी योग प्राणायाम, झुंबा डान्स, करो योग रहो निरोग जय घोष करून योग दिनाचा आनंद लुटला.

Latest Posts

Don't Miss