Latest Posts

आपले सरकार सेवा केंद्राकरीता छाननीअंती प्राप्त अर्जाची यादी प्रसिद्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपुर : जिल्हयामध्ये महसुल विभागाशी संबंधीत सर्व सेवा ह्या ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये नागरीकांना त्यांचे रहात असलेल्या परिसरामध्ये, गावामध्ये सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी १९ जानेवारी २०१८ मधील शासन निर्णयातील निकषानुसार १५३ आपले सरकार सेवा केंद्राचे नव्याने वाटप करण्याबाबत अर्ज मागविण्यात आलेले होते. या संदर्भात एकूण १ हजार ४८ अर्ज प्राप्त झाले छाननी अंती आपले सरकार सेवा केंद्राकरीता प्राप्त अर्जाची यादी जिल्हा संकेतस्थळ Nagpur.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

आपले सरकार सेवा केद्राकरीता अर्ज केलेल्या अर्जदारांनी सदर संकेतस्थळाला भेट देऊन यादी बघता येईल. यामध्ये काही आक्षेप असल्यास १९ जुलैपर्यंत (सुटीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी कार्यालय माहिती व तंत्रज्ञान विभाग येथे लेखी आक्षेप सादर करावा. यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Latest Posts

Don't Miss