Latest Posts

युवकांनी शरीर व मन निरोगी ठेवण्याकरिता नियमीत व्यायाम करावा : खासदार रामदास तडस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आपण खुप नशीबवान आहोत की स्वातंत्रोत्तर काळात आपला जन्म झाला. गुलामगिरी म्हणजे काय असते याची जरा सुध्दा आपणास जाणीव झाली नाही. आपण स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास फक्त पुस्तकातून वाचन करतो आणि तेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता युवकांची देशाला हातभार व प्रगतीवर नेण्याची जबाबदारी आहे, यासाठी आपले शरीर व मन निरोगी ठेवणे आवश्यक आहे. स्वातंत्र दिनाच्या निमीत्ताने आज येथे व्यायामशाळेचा लोकार्पन होत आहे, युवकांनी आपले शरीर व मन निरोगी ठेवण्याकरिता नियमीत व्यायाम करावा असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांनी केले. ते तळेगांव (टालाटुले) येथे व्यायामशाळा लोकार्पन प्रसंगी बोलत होते.

स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन तळेगांव (टालाटुले) येथे जिल्हा विकास निधी जिल्हा क्रीडा अनुदान अंतर्गत व्यायाम शाळेचा लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला कार्यक्रमाला माजी सभापती मिलिंद भेंडे, सरपंच कृष्णाजी गुजरकर, प.स. माजी सभापती महेश आगे, प्रमोद वरभे, गजानन भोयर, माजी सरपंच अतुल तिमांडे, भास्कर वरभे, गजानन महाजन, विकास ठोंबरे, गजानन येवतकर, माजी सरपंच माणिक भोयर, देवराव तडस, प्रशांत वंजारी व मोठया संख्येने युवक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss