Latest Posts

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : येथील गोरक्षण वार्डात एका युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आले. सदर युवकाचे नाव प्रमोद देवराव चनोले (३५) वर्ष आहे.

माहितीनुसार, गोरक्षण वार्ड येथे रविंद्र मेश्राम यांचा घरी किरायाने परिवारात सहित प्रमोद चनोले राहत होता. आज त्याच्या घरचे परिवार नागभिड ला लग्नाला गेले असता त्यांनी गळफास लावून आत्महत्या केले. पोलिसांना माहिती मिळताच पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करीता पाठविले आहे.

मृतक प्रमोद चनोले याचे लग्न झाले असून पाच वर्षाचा एक मुलगा आहे. मागील एक वर्षापासून त्याची पत्नी नागपूर येथे माहेरी राहत होती. त्याला दारूचे व्यसन होते. तसेच तो गैरेज मध्य मेकॅनिकल चे काम करीत होता.

पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्की लोखंडे व पोशी विलास खरात करीत आहे.

Latest Posts

Don't Miss