Latest Posts

युवक कांग्रेस तर्फे गोल पुलियाच्या मध्य भागी बेशरमाचे झाडे लावून आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात आज आंदोलन केले.

रेल्वे प्रशासन ने गोल पुलाचे तिसऱ्या व चौथ्या लाइन चे कामे केली. त्यावेळी रेल्वे व मजीप्रा ने गोल पुल्याच्या मधल्या भागाचे दुरुस्ती करताना पूर्ण खराब केले होते. ठेकेदार सर्व रस्ता तयार करून देणार होते. पण ते पूर्ण न करताच निघून गेले. वस्ती विभागात येण्या-जाणाऱ्या नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो.

त्याकरिता प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी साठी गोल पूलात युवक कांग्रेस प्रदेश महासचिव चेतन गेडाम यांनी बेशर्माचे झाड़े लावुन विरोध प्रदर्शन केले.

यावेळी एनएसयूआई जिल्हा अध्यक्ष शफक शेख, जिल्हा महासचिव शंकर महाकाली, विधानसभा अध्यक्ष जूनेद सिद्दीक़ी, तालुका अध्यक्ष रुपेश भोयर,एनएसयूआईचे दानिश शेख,तालुका उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, सामाजिक कार्यकर्ता आकाश दुर्गे,कामगार सेल अध्यक्ष करण कामटे,ओबीसी नेते विवेक कुटेमाटे, अल्पसंख्यक कांग्रेस शहर उपाध्यक्ष आफ़ताब पठान, कैलाश धनोरकर, सुनील मोतीलाल गोपाल कलवल, संतोष बरसागड़े, रोहित पठान, अक्षय आरेकर, सोनू आमटे, राजा केशकर, शंकर गडमवार, अक्षय वांढरे, बशीर सिद्दीक़ी, श्रीकांत गुजरकर, सलीम शेख, शबीर शेख, रुपेश मून, सागर गेडाम सह युवक कांग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss