Latest Posts

क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपले करिअर बनवावे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम

– भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचे राजेंचा हस्ते बक्षीस वितरण संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Mulchera) : स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व. जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यार्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते, मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात.

या फूटबॉल स्पर्धचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम (Former Guardian Minister Raje Ambrishrao Atram) हे होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले, फूटबॉल खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो, आपले भविष्य बनवू शकतो आणि आपल्या गावाचे, आपल्या जिल्हाचे व आपल्या देशाचे नाव उंचावर नेऊ शकतो, आपल्या क्षेत्रातील युवकांनमध्ये खेळांच्या बाबतीत खुप गुणवत्ता आहे, काही खेळाळूनी तर आपल्या क्षेत्राचे नाव देश-विदेशात बनवले आहे.

आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, मॅरोथॉन अशा अनेक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो. सहकार्य करत असतो, युवकांनी गाव पातळी पर्यंत मर्यादित न राहता, क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे आणि आपले करीयर बनवावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी युवकांना केले, पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या सोबत आहो. माझ्या कडून सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आणि कार्यकर्ते यांच्या आग्रह खातीर त्यांच्या घरी भेट देऊन अल्पोपहार घेत कार्यकर्ते यांचा आनंद द्विगुणीत केला. बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम बक्षीस- २५ हजार देवनगर टीम विजेत्याने पटकाविला. तर द्वितीय बक्षीस-१५ हजार भवानीपुरच्या विजेत्याने पटकविला होता.

यावेळी अहेरी इस्टेट चे राजकुमार अवधेशबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, जिल्हा सचिव बादल शाह, अहेरी तालुका अध्यक्ष रवि नेलकुंद्री, मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार, युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम, किशोर मल्लिक, गणेश गारघाटे, अक्षय चुधरी, गुलशन मलेमपल्ली, पवन आत्राम, उत्तम शर्मा तसेच भवानीपुर येथील गावकरी आणि फूटबॉल खेळाळू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss