Latest Posts

युवकांनी शारीरिक श्रमासाठी खेळ खेळावे : खासदार अशोक नेते

– भारतीय जनता पार्टी शहर चामोर्शी व जय बजरंग युवा मंडळ संताजी नगर यांच्या वतीने

– भव्य खुले रात्र कालीन खासदार नमो प्रो, कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन

– भव्य एलईडी स्क्रीन यूट्यूब चैनल लिंक वर स्पर्धेचे थेट लाईव्ह टेलिकास्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : २३ जानेवारी २०२४ पासून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरातील संताजी क्रीडांगण   ( गोंडपुरा ) येथे प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठे खासदार नमो चषक प्रो कबड्डी सामने प्रथम बक्षीस (१,०१,१११ /- )एक लाख एक हजार एकशे अकरा, रुपये व शिल्ड, द्वितीय बक्षीस ( ८८८८८ /-)अठ्ठ्यांशी हजार आठशे अठ्ठ्यायांशी रूपये, तिसरे बक्षीस ( ७७७७७/-) सत्याहतर हजार सातशे सात्याहतर रुपयाचे बक्षिसाचे कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात आले.

या सामन्याचे आयोजक भारतीय जनता पार्टी शहर व जय बजरंग युवा मंडळ संताजी नगर गोंडपुरा चामोर्शी द्वारा आयोजित भव्य खुले रात्र कालीन प्रो कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मिलिंद नरोटे विशेष अतिथी माजी न्यायाधीश सुनीलजी दीक्षित, भाजपा महिला आघाडी चिटणीस सौ. रेखा डोळस, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, नगरसेवक तथा कार्यक्रमाचे आयोजक आशिष पिपरे, मार्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, भाजपा नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सौ. सोनाली पिपरे, भाजपा नेत्या सौ.पल्लवी बारापात्रे, सौ. श्रीमंतवार, भाजपा शहराध्यक्ष सोपान नैताम, सामाजिक कार्यकर्ते कालिदास बुरांडे, भाजपा शहर महामंत्री वासुदेव चीचघरे, भाजपा नेते किशोर कुडवे, शिक्षक पुरुषोत्तम भांडेकर, इसाफ बँकेचे व्यवस्थापक योगेंद्र बावनकर, आकाश थुटे, क्रीडा प्रशिक्षक राकेश खेवले गडचिरोली जिल्हा कबड्डी असोसिएशन चे आशिष विश्वास बँक व्यवस्थापक आकाश थुटे भाजपा ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, भाजपा सहकार आघाडी तालुकाध्यक्ष अशोक धोडरे, उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थितांना कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, मागील दोन-  तिन वर्षापासून कोरोनामुळे कोणतेही खेळ झाले नाही.यासाठी युवकांच्या शारिरीक श्रमाच्या विकासा संबंधित देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी नमो चषक ही संकल्पना आणली.

नमो चषक मध्ये विविध प्रकारचे खेळ समाविष्ट आहेत. यात युवकांना शारिरीक विकास साधता यावा. यासाठी खेळाचे आयोजन आहे. आजचा युवक मोबाईल मध्ये दिवसभर व्यस्तेत असते. या मोबाईलमुळे युवकांचा शारिरीक श्रम खुंटला असुन शारिरीक श्रम कमी झाला आहे. यासाठी बौद्धिक विकासा बरोबरच शारिरीक विकास महत्वाचा आहे. याकरिता युवकांनी शारिरीक श्रमासाठी खेळ खेळावे. असे प्रतिपादन‌ या खेळाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सामाजिक कार्यकर्ते स्पंदन फाउंडेशन अध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा महिला आघाडी प्रदेश चिटणीस रेखा डोळस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात भव्य स्क्रीन लावण्यात आले व मोबाईल लिंक वर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्षाचे शहर पदाधिकारी कार्यकर्ते व जय बजरंग युवा मंडळ अध्यक्ष रुपेश वासेकर, उपाध्यक्ष हितेश नैताम, सचिव स्वप्नील वासेकर, कोषाध्यक्ष गौरव भांडेकर, अमोल वासेकार, प्रमोद भुरसे, सचिन सोमनकर, प्रनय धोडरे, व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा नगरसेवक आशीष पिपरे व संचालन रमेश अधिकारी यांनी केले.

Latest Posts

Don't Miss