Latest Posts

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास करीत कांचनपूर येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी केला भाजपा प्रवेश

– भारत बिश्वास या कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Mulchera) : तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कांचनपूर येथे माँ काली माता पूजा महोत्सव निमित्ताने भेट देण्यासाठी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे कांचनपूर येथे दौऱ्यावर आले असता, ह्यावेळी तेथील २० युवा कार्यकर्त्यांनी राजे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून भाजप पक्ष प्रवेश केला.

यावेळी राजे साहेबानी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले. पिंकू मंडळ, जितेन बिस्वास्, संजय रॉय, अप्पू सरकार, राज बाईन, शुभास सरकार, दयाल मंडळ, शपन मजुनदार, रत्नेस्वर बाईन, समीर सिकदार, इत्यादी कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला.

तसेच कांचनपूर येथील भाजप कार्यकर्ते भारत बिश्वास यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. याची माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मिळताच त्यांनी घरी जाऊन भारत बिश्वास यांच्या कुटूंबाची भेट घेतली आणि आस्थेने त्यांची विचारपूस करून त्यांच्या कुटूंबाला
१०,००० /-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.

त्यावेळी युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, वैष्णव ठाकूर, शुभम कुत्तरमारे हे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss