Latest Posts

जिल्हा परिषद भंडारा पदभरती परीक्षा १५ ऑक्टोबरपासून आयबीपीएसने दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार परीक्षा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हा परिषद,भंडारा येथील विविध पदांच्या भरतीसाठी पहिल्या टप्प्यात काही पदांची परीक्षा झाली असून आता दिलेल्या वेळा पत्रकानुसार पुढील संवर्गाचे वेळापत्रक प्राप्त झालेले आहे. त्यासाठी १५ ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रीकल, १७ ऑक्टोबर रोजी वायरमन,फिटर व पशुधन पर्यवेक्षक, १८ ऑक्टोबर, रोजी सुपरवायझर, २१ व २३ ऑक्टोबर, रोजी कनिष्ठ अभियंता सिव्हिल बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा, तसेच २२ ऑक्टोबर, रोजी औषध निर्माण अधिकारी पदभरती होणार आहे.

त्यासाठी संवर्गाच्या परिक्षेकरिता केंद्र ,निश्चित करण्यात आली आहे. यापैकी उमेदवारास कोणते केंद्र, निश्चित करुन देण्यात आले आहे. याची माहिती उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर नमुद करण्यात आलेली आहे. तसेच परिक्षा केंद्र, असलेल्या गावांचे नांव व परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

भंडारा साईराम प्रा. भंडारा, तुमसर स्व.अजय पार्डी मेमो PVT ITI खसरा (तुमसर) नागपूर, i. Ion digital zone वाडी टेकग्रेसर सॉफ्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी हिंगणा वाडी रोड मोर्टस bmw showroom नागपूर Modern महाविद्यालय एमआयडीसी टि -पॉईंट वाडी opp राहुल हॉटेल अमरावती रोड, वाडी, नागपूर या केंद्रावर परीक्षा होणार आहे.

तसेच उर्वरीत संवर्गाच्या परिक्षेचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रसिध्दी करण्यात येईल. तथापी उमेदवारांनी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घ्यावी,

संवर्गाच्या परिक्षा १५ ऑक्टोबर, १७ ऑक्टोबर, १८ ऑक्टोबर, २१ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर, तसेच २३ ऑक्टोबर, २०२३ पर्यत आहेत. त्याकरिता परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्यांची प्रत छापून घेऊन त्यातील सूचना प्रमाणे पुढील कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss