विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हा परिषद, भंडारा येथील पदभरती २०२३ अंतर्गत १५ ऑक्टोबर २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा संबंधाने बातमी प्रसिध्दी करण्यात आली होती. परंतु आय.बी.पी.एस.कंपनी कडून प्राप्त संदेशानुसार १८ ऑक्टोबर २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२३ या घेण्यात येणाऱ्या संवर्गनिहाय ऑनलाईन परीक्षा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
तरी १८ ऑक्टोबर २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील परीक्षे संबंधातानी काही सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळावर bhandarazp.org प्रसिध्दी करण्यात येईल. यांची संबधित उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद, भंडारा या विभागानी कळविले आहे.