Latest Posts

मागासवर्गीय मुला, मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशास १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात शहरातील मागावर्गीय मुलां/मुलींची एकुण १४ वसतिगृहे तसेच तालुका स्तरावदरील मागासवर्गीय मुलां/मुलींचे एकुण ११ शासकीय वसतिगृह उमरेड, कुही (मुलांचे), कुही (मुलींचे), वानाडोंगरी (मुलांचे), वानाडोंगरी (मुलींचे), नांदा ता. कामठी (मुलांचे), पारशिवनी (मुलांचे), काटोल (मुर्लीचे), रामटेक (मुलींचे), कळमेश्वर (मुलींचे), सावनेर (मुलींचे) अशा एकुण २५ शासकीय वसतिगृहांकरीता सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरीता शालेय अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

शासकीय वसतिगृहाचे आनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत आज्ञावली विकसनाचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे अर्ज आनलाईनरित्या स्वीकृत करण्याबाबतचे मोड्युल महाआयटीद्वारे कार्यरत झालेले आहे. त्यानुसार ३१ जुलै पासून https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे सत्र २०२४-२५ या सत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील रिक्त जागेसाठी ज्या इच्छुक विद्यार्थी, विद्यार्थिनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा गरजू विद्यार्थ्यांना आनलाईन अर्ज भरता येणार आहे.

आनलाईन पोर्टलचे हे प्रथम वर्ष असल्याने सन २०२४-२५ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत  असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट पोर्टलवरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊन अर्ज नागपूर शहरातील सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलींचे एकूण ६ शासकीय वसतिगृह व मुलांचे एकूण ८ वसतिगृहांत प्रवेशासाठी शहराच्या केंद्रभागी असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वसंतनगर चोखामेळा परिसर, दीक्षाभूमी चौक येथे तसेच ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील एकूण ११ वसतिगृहात प्रवेशासाठी संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss