Latest Posts

सारथीतर्फे युवक – युवतींकरिता कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षण

– १८ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, (सारथी) यांच्यातर्फे पुणे व नाशिक येथे मोफत कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षणाकरिता १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना पुणे व नाशिक येथे मोफत कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षणाकरिता अर्ज करता येणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत एक दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्रमुख ठिकाण, कृत्रिम रेतन ३० दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी पुणे, पेठ-नाशिक आणि ६० दिवसीय कार्यानुभव प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्रमुख ठिकाण नेमण्यात आले आहे. सदर उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अर्ज करण्यासाठी १८ सप्टेंबर२०२४ ला सायंकाळी ६.१५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या  http://sarthi-maharashtragov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss