विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
येथे होणार शिबीर –
– २३ सप्टेंबर ला आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा
– २४ सप्टेंबर ला एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी
– २५ सप्टेंबर ला शासकीय विश्रामगृह, चिमूर
– २६ सप्टेंबर ला शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी
– २७ सप्टेंबर २०२४ ला शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर
वरील दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन नियुक्ती कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल, याची नोंद चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.