Latest Posts

आपले सरकार २.० व्दारे होणार नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारीचे निवारण विभागप्रमुखांचे प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): आपले सरकार २.० व्दार नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारीचे जलद निवारण करण्याच्या दृष्ट्रीने विभागप्रमुखांनी काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे उपस्थित होते.

नियोजन भवन येथे आज जिल्हयातील सर्व विभागप्रमुखाना आपले सरकार २.० बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभाग व महाआयटीचे जिल्हा प्रमुख उमेश घुगुसकर यांनी ही या पोर्टलबाबत माहिती दिली. तसेच मंत्रालय मुंबई येथून देवांग दवे ई-गव्हर्नन्स तज्ञ, सरकार. शुभम पै – सिल्व्हर टचचे तांत्रिक तज्ञ. विनोद वर्मा व हर्षल मंत्री-सपोर्ट टीम आपले सरकार यांनी सदर पोर्टल बद्दल झालेले नवीन अपडेट याबाब्द्ल माहिती दिली. नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार २.० हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे.

राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. ही तक्रार निवारण प्रणाली https://grievances.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या प्रणालीचे प्रशासकीय व तांत्रिक दृष्टीकोनातून अद्ययावतीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारींचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठ कार्यालयांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ.संदर्भात शासनाने या प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची विहित कार्यपद्धती निश्चित केली आहे.

संबंधित शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शासनाने आता आपले सरकार २.० या संगणकीकृत तक्रार निवारण प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे नवीन वैशिष्टे विहित केली आहेत. आता सदर प्रणालीद्वारे जिल्हा तथा तालुका स्तरावर पूर्ण विभागांचे लोगिन उपलब्ध करून दिले असून नागरिकाचे तक्रारीचे निवारण लवकरात लवकर होईल.

Latest Posts

Don't Miss