Latest Posts

होमगार्ड निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी ९ व १० सप्टेंबरला उपस्थित रहावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट पथकातील १२७ पुरुष होमगार्डच्या पदांचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी नाव नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पात्र उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php  या संकेत  स्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्यक्ष जिल्हा होमगार्ड कार्यालय वर्धा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.

उमेदवारांनी नाव नोंदणीच्या वेळी सादर केलेली मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार किंवा निवडणूक कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा १० वीचे बोर्ड प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या झेरॉक्स प्रती, स्व:ताचे दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित रहावे. यावेळी उपस्थित झालेल्या उमेदवारांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन आवश्यक सूचना तसेच होमगार्ड संघटनेविषयी माहिती देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची पुढे पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र केले जाईल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss