Latest Posts

 मराठा, कुणबी, शेतकरी युवक/युवती करिता मोफत रिमोट पायलट प्रशिक्षण उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी पुणे ही संस्था महाराष्ट्र राज्यतील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांकरिता सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली स्थापन करण्यात आलेली आहे.

या संस्थे मार्फत शेतकरी युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजीटल फार्मिंग सोल्यूशन्स बाय रोबोट, ड्रोन & एजवी या DGCA मान्यता प्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण व Professional certificate course on drone in Agriculture तसेच, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत राहुरी येथे रिमोट पायलट ट्रेनींग केंद्रावर रीमोट पायलट प्रशिक्षण घेणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ पर्यंत देण्यात आलेली आहे. तसेच ऑफलाईन अर्ज पाठविण्याकरिता तारीख २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.

विस्तृत माहिती सारथी च्या https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील शेतकरी युवक/युवतीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सारथीचे विभागीय कार्यालय नागपूर येथील उपव्यवस्थापकीय संचालक, तथा उपविभागीय अधिकारी नागपूर शहर सुरेश बगळे यांनी केलेले आहे.

 

Latest Posts

Don't Miss