Latest Posts

खाजगी प्रवासी बसेसवर जादा भाडे आकारणीबाबत तपासणी मोहीम सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सर्व मोटार वाहन निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत की, शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसकडून शासनाने ठरविलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्याबाबत तपासणी करावी. दोषी आढळून आलेल्या बसेसविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

१ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या कालावधीत खाजगी बसेसच्या वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून जादा भाडे घेतले जात असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यासंबंधी मोटार वाहन कायदा आणि तद्नुषंगिक नियमांनुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी देखील, जर कोणाकडून जादा भाडे आकारले गेले असल्यास, त्यांनी त्याबाबतचे पुरावे सोबत जोडून dyrto.36mh@mah.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करावी. यामुळे दोषी वाहनांवर त्वरीत कारवाई करणे शक्य होईल.

या तपासणी मोहीमेत दोषी आढळून आलेल्या वाहनांवर झालेल्या कारवाईचा अहवाल नियमितपणे परिवहन आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

Latest Posts

Don't Miss