Latest Posts

चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : प्रादेशिक विभागातील चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टुरिझम अँड पीस या विषयावर चित्रकला पेंटींग ए ३ साईजच्या माऊंट बोर्डवर कोणत्याही कलर मीडियामध्ये तयार करून २० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे जमा करता येणार आहे. तर निबंधासाठी पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दुत आणि प्रतिक असे विषय असणार आहे.

निबंध आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना पारिताषिके, स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्यांना पर्यटक निवासात दोन व्यक्तींना दोन रात्री व तीन दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह, व्दितीय पारितोषीक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना एक रात्र व दोन दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह. तृतीय पारितोषीक  विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात दोन व्यक्तींना एक दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन विभागाच्या ०७१२-२५३३३२५ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा ronagpur@maharashtratourism.gov.inया ई-मेल वर संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss