Latest Posts

पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : यूपीएससी परीक्षा प्रक्रियेत करणार बदल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर या अनेक कारणांमुळे चर्चेत आल्या आणि यूपीएससीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणामुळे मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर यूपीएससी अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाला खडबडून जाग आली असून परीक्षा प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा प्रक्रियेत डिजिटल बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

खेडकर या दिव्यांग प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रामुळे चर्चेत आल्या. या पाश्र्वभूमीवर यूपीएससीने फसवणूक टाळण्यासाठी आणि तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. परीक्षेची विश्वासार्हता राखण्यासाठी यूपीएससीने बायोमेट्रिक प्रणालीच्या तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून निविदाही मागवल्या आहेत. याद्वारे परीक्षा प्रक्रियेची सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

असे असेल तंत्रज्ञान –
– आधार क्रमांकावर आधारित फिंगरप्रिंट प्रमाणीकरण किंवा डिजिटल फिंगरप्रिंट कॅप्चरिंग.
– उमेदवारांसाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान.
– ई- ॲडमिट कार्डसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग.
– परीक्षेदरम्यान एआय आधारित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम.

Latest Posts

Don't Miss