Latest Posts

सेवानिवृत्त शिक्षकांना पेसा क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा देण्याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, सदर पदांची पदभरती झालेली नसल्याने जिल्ह्यातील अतिदुर्गम व सर्वसाधारण क्षेत्रातील बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्र १५ जुलै २०२४ नुसार सदर रिक्त पदांवर प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधुन अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासंबंधाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांना प्राप्त झाले आहे.

त्यानुसार सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदविधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचेकडून सदर पदावर काम करण्यास इच्छुक असल्यास विहित नमुन्यामध्ये संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी आवाहन केलेले आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना त्यांचे तालुक्यातील निवृत्तीवेतन घेत असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदविधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचेकडून ३१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज मागविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याकरीता विहित नमुना जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सुचनाफलकावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

Latest Posts

Don't Miss