Latest Posts

अहेरी शहरातील इंदिरानगर (बेघर कॉलनी) येथील कर्करुग्णाला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

– दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी शहरातील इंदिरानगर (बेघर कॉलनी) येथील सुरेश आलाम यांना कर्करोगाने ग्रासले परंतू आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खर्च झेपत नसल्यामुळे अर्धवट ऊपचार करुन नागपुरातुन परतावे लागले.

कुटूंबीयांनी आपली व्यथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Former Guardian Minister Raje Ambrishrao Atram) यांचा पर्यत पोहोचवली असता गोर गरीबांच्या मदतीला सदैव तत्पर असणार्‍या दानशूर राजे यांनी लगेच कुटूंबियांना बोलावून आर्थिक मदत दिली. तसेच पुढील ऊपचाराची व्यवस्था सुध्दा लावून दिली.

क्षेत्रातील जनतेची सदैव काळजी घेणारे राजे यांच्या दातृत्वाबद्दल सर्वत्र आभार व्यक्त केल्या जात आहे.

Latest Posts

Don't Miss