Latest Posts

बेस्टच्या ७०० एसी बस फायलीतच थंडावल्या : पुरवठा करणाऱ्या कंपनीला टाकले काळ्या यादीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : बेस्टच्या जुन्या डबल डेकर बस इतिहासजमा झाल्यानंतर मुंबईकरांना किमान एसी ई डबल डेकरचा आनंद घेता येईल, असे वाटले होते. मात्र, हे सध्या तरी अशक्य वाटत आहे. आज उद्या करीत तब्बल ७०० एसी ई डबल डेकर बसचा पुरवठा करणाऱ्या ई काॅसिस कंपनीलाच अखेर बेस्टने काळ्या यादीत टाकले आहे.

त्यामुळे बेस्टच्या पर्यावरणपूरक धोरणाला फटका बसला असून, ताफ्यात गाड्या कमी असल्याने प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत.

बेस्टच्या जुन्या डबलडेकर बस इतिहासजमा झाल्याने प्रवाशांना या बस आनंद घेता यावा, यासाठी एसी डबलडेकर बस घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. यासाठी बेस्टने निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेस प्रतिसाद देत स्विच मोबॅलिटी व कॉसिस कंपनीने डबलडेकर बसचा पुरवठा करण्यास होकार दिला. मात्र, तीन वर्षांत एकही बस संबंधित कंपनीने पुरविली नाही. त्यामुळे काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देताच स्विच मोबॅलिटी ने ५० बस पुरविल्या, तर १५० बस लवकरच पुरविण्यात येणार असल्याचे मान्य केले. मात्र, ई कॉसिस कंपनीने एकही बस पुरविली नसल्याचे दंड व काळ्या यादीत टाकण्याची कारवाई बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

धोरणाला फटका –
१) बेस्ट प्रवाशांची दररोजच्या प्रवाशांची संख्या ३२ ते ३५ लाखांवर गेली आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात सध्या ३ हजार ३८ बस आहेत. यातील अनेक बस त्यांची कालमर्यादा संपली आहे.
२) यावर्षी किमान ५०० बस बाद होणार आहेत. त्यामुळे बसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शिवाय बेस्ट च्या धोरणानुसार २०२६ पर्यंत गाड्यांचा एकूण ताफा १० हजार ई-बसपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, बसचा ताफा दाखल होत नसल्याने १० हजार बस कागदावरच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest Posts

Don't Miss