Latest Posts

लॉयड्स मेटल कंपनी तर्फे आंतरशाळा क्रिकेट स्पर्धा संपन्न

– आर.ओ सीसी एटापल्ली प्रथम विजेता संघ
– मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : आझादी का अमृत महोत्सव निमित्य ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली च्या भव्य पटांगणावर १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसीय क्रिकेट सामने दरम्यान २८ टीम ने स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

त्यामध्ये एटापल्ली तालुक्यातील डुम्मे, तोडसा, परपंगुडा, हेडरी, उडेरा तसेच तालुका बाहेरून १३ टीम ने सहभाग नोंदविला असून त्यामध्ये प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये चे मानकरी आर.ओ. सीसी क्रिकेट क्लब एटापल्ली तर दुसरे पारितोषिक २० हजार रुपये, भगवंतराव क्रिकेट क्लब एटापल्ली व तिसरे पारितोषिक १५ हजार चे प्रणय इलेव्हन क्रिकेट क्लब एटापल्ली व तसेच चौथे पारितोषिक जय बजरंग क्रिकेट क्लब डुम्मे १० हजार चे मानकरी ठरले. अंतिम सामने चे उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, आणि उत्कृष्ट मॅन ऑफ द मॅच चे मानकरींना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंचावर उपस्थित भगवंतराव कला व विज्ञान प्राचार्य डॉ. एस.एन. बुटे, प्राध्यापक कोंगरे, लॉयड मेटल्सचे मानव विकास चे प्रबंधक दिलीप बुराडे, एटापल्ली तालुक्याचे जेष्ठ नागरिक दत्ताजी राजकोंडावार, राजा, एटापल्ली नगरपंचायत चे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक निजान पेंदाम, संजय चांगलानी तसेच गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन किशोर बुरबुरे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss