Latest Posts

गोवंश तस्करी : सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गोवंशाची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने २ मे रोजी रात्री मुल पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आली असून, एक वाहनांसह १६ लाख पन्नास हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी वाढली असून, या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. असे असले तरी कोणत्या ना कोणत्या मार्गावरून गोवंशाची तस्करी सुरूच आहे. दरम्यान, २ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना गस्त घालताना गोपनीय माहिती मिळाली की मुल मार्गाने गोवंश ची तस्करी होत आहे. सदर पथकाने मुल येथील रेल्वे गेट जवळ नाकाबंदी करत ट्रक क्रं. सीजी २४ एस ७६६७ ला थांबविले असता ट्रक मधील दोन जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. ट्रक ची तपासणी केली असता एकूण ३७ गोवंश जनावरे त्या मध्ये ४ मृत जनावरे व वाहन किंमत अंदाजे १६ लाख ५० हजार रुपये चा माल जप्त करण्यात आले. आरोपी ट्रक ड्रायव्हर नईमउद्दीन करीमउद्दीन शेख (३९) रा. शांतीनगर, घुग्घुस ता.जि. चंद्रपुर याला अटक करून मुल पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले. पळून गेलेले ईसम असलम शेख, इर्शादउल्ला खान दोन्ही राह. मुर्तिजापुर जि. अकोला असून त्यांचे शोध सुरू आहे. सदर जनावरे कुरखेडा घाट जि. गडचिरोली येथुन आणले असुन सादिक खान रा. गडचांदूर याने आणण्यास सांगितले असे ड्रायव्हर ने सांगितले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ऐकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार नापोशि संतोष येलपुलवार, पोशि नितीन रायपुरे चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.

Latest Posts

Don't Miss