Latest Posts

ड्रोन पायलट : मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / परभणी (Parabhani) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत असून या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व वनामकृवि परभणी यांच्या मध्ये करार झाला आहे.

या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामधे पिक निरिक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणी सारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मिती सारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्तिथी होती.

या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर ऊपलब्ध असून सदरील अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गूगल फॉर्म द्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा.

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय, ई. सारख्या क्षेत्रात नौकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील ४ वर्षापासुन नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले आहे.

संशोधन विद्यार्थ्यांना काटेकोर कृषी व्यवसायकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत व विविध १२ देशात ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच २५ प्राध्यापकांना एक ते तीन महिने प्रशिक्षणासाठी पाठविले व त्यावर संशोधन प्रकाशने झाली.

सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषि संबंधित सेवा कार्य करीत असून पाच वर्षाचा करार कालावधी दरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्ती सारख्या कार्याकरिता वनामकृवि सोबत कार्य करणार असून या करारातून दोन्ही संस्थांना निश्चित कार्य प्रणाली करण्यास आश्वासित केले.

Latest Posts

Don't Miss