Latest Posts

चित्रपट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर : या दिवशी मिळेल फक्त ९९ रुपयांत तिकिट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : तुम्हालाही चित्रपट पाहण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. दरम्यान, १३ ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. त्यामुळे तुम्हाला चित्रपट स्वस्तात पाहण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

चित्रपट दिनानिमित्य देशभरातील सर्व चित्रपटगृहे प्रेक्षकांना केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे देणार आहेत. ही ऑफर देशातील सर्व PVR, INOX आणि Cinepolis वर वैध असणार आहे.

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच MAI ने जाहीर केले आहे की, यावर्षी १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल. या निमित्ताने चित्रपटप्रेमींना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे मिळणार आहेत. MAI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, PVR, INOX, Cinepolls, Mirage आणि Delight यासह देशभरातील ४ हजार हून अधिक चित्रपटगृहांनी राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हातमिळवणी केली आहे.

निवेदनानुसार, या विशेष प्रसंगी सर्व वयोगटातील लोक एकत्र येऊन एका दिवसासाठी चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील आणि यावर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या चित्रपटांचा आनंद साजरा करू शकतील. दरम्यान, या दिवशी तुम्ही जवान ते गदर २, फुक्रे ३ पर्यंतचे सर्व चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता.

कधी आणि कसे बुकिंग करू शकता?
हा नियम १३ ऑक्टोबरला देशभरातील ४ हजार स्क्रीन्सवर लागू होणार आहे. जिथे PVR, INOX, Cinepolls, Mirage, Citypride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight या मल्टिप्लेक्स चेन्स यात सहभागी होतील. तुम्ही बुक माय शो, पेटीएम किंवा फोन पे द्वारे तिकीट ऑनलाइन बुक करू शकता.

Latest Posts

Don't Miss