Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी देसाईगंज- वडसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना देसाईगंज- वडसा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते व फॅशन मालचे मालक जेसा मोटवानी आणि नगरपंचायतचे नगरसेवक हरीश मोटवानी यांच्या भेट घेतली.

भेटी दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील तिनीही आजी- माजी आमदारांच्या विरोधात जाऊन अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत एक हाती सत्ता प्राप्त करून सभापतीपदी विराजमान झाल्याने माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या सत्कार करण्यात आली. तसेच विविध विषयांवार चर्चा करण्यात आले.

यावेळी नरेश गर्गम, शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगडे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss