विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाला अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी जिल्हा क्रीडा संकुल परिसरात घडली. सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी असे मृतक युवकाचे नाव आहे.
माहितीनुसार, पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो जिल्हा क्रीडांगणावर पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी म्हणून गेला होता. काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तो औषधी घेण्यासाठी गेला व चक्कर येऊन तो मृत्युमुखी पडला.