Latest Posts

ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची डेडलाइन समोर आलेली नाही. या यत्रणेंतर्गत, युजर्स महामार्गावर जेवढे किलोमिटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल.

Latest Posts

Don't Miss