Latest Posts

‘दिलखुलास’ मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ‘लोकसभा निवडणूकांची तयारी’ यावर मुलाखत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 वर्धा जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात गुरुवार 25 एप्रिल 2024  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे -राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वर्धा जिल्ह्यात असलेले लोकसभा मतदार संघ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधा याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली आहे.

Latest Posts

Don't Miss