Latest Posts

शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज : नाबार्डने RBI सोबत केला करार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : शेतकऱ्यांना कर्ज घेणे आता सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही. आता त्यांना केवळ ५ मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केली आहे.

नाबार्डने आपल्या ई-केसीसी लोन (e-KCC loan) प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) जोडले जाईल. नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (आरआरबी) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

ॲग्री लोन्सच्या डिजिटायझेशनमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणे शक्य होईल. यामुळे नाबार्डचे ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही. यांनी दिली.

५ मिनिटांत मिळणार ॲग्री लोन –
नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्या वक्तव्यानुसार, भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील १२ कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन-चार आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांवर येईल.

Latest Posts

Don't Miss