Latest Posts

गावकऱ्यांनी पोलिसांच्या साहाय्याने अवैध जनावर तस्करीची दोन ट्रक पकडून ६० बैलांना दिला जीवनदान 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची (Korchi) : गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर टोकावर असलेले कोरची तालुका हा जनावर तस्कराचा अड्डा म्हणून ओळखला जात आहे. या तालुक्यातून नेहमीच अवैध जनावरांची कत्तलीसाठी तस्करी केली जात आहे. तसेच शेजारच्या छत्तीसगड राज्यातून व गोंदिया जिल्ह्यातील सीमेलगत गावाहुन कोरची तालुक्यातील मार्गातून तेलंगणा, हैद्राबाद, चंद्रपूर, नागपूर येथे कत्तलखान्यात शेकडो मुके गाय-बैलांना कत्तलीसाठी ट्रकांमधून तस्करी केली जात आहे.

सोमवारी रात्री नऊ वाजता दरम्यान बेळगावच्या गावकऱ्यांना अवैध जनावरांची ट्रकामध्ये कोंबून तस्करी करत असल्याची खात्रीशीर माहिती होती ही माहिती बेळगाव पोलीस मदत केंद्र येथील पोलीस अधिकारी उदय पाटील यांना दिली त्यानंतर पोलिसांनी सापडा रचून कोरची बेडगाव मार्गावर नाकेबंदी करून ट्रक क्रमांक MH ४० CD १५४५, MH ३४ BG ४२५९ ही दोन ट्रक पकडली या दरम्यान तस्कर घटनास्थळावरून फरार झाली पोलीस व गावकऱ्यांनी ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये अनेक बैल अवैधरित्या कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. सदर ट्रकांतुन जीवंत ६० बैल तर दोन बैल मृत अवस्थेत आढळून आले. या ६० बैलांची अंदाजे ६ लाख रुपये, तर दोन ट्रकांची २० लाख अशी एकूण २६ लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई बेडगाव पोलीस मदत केंद्र अधिकारी उदय पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रबोधन जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल धाकडे व पोलीस अंमलदार यांनी गावकऱ्यांच्या साहाय्याने केली आहे.

यापूर्वी सुद्धा अनेकदा नाकाबंदी करून बेडगाव पोलिसांनी बोरी वरून येणाऱ्या अवैध जनावरांच्या अनेक ट्रंक पकडून मुके जनावरांची सुटका करून कारवाई केलेली आहे तर तालुक्यातील काही चोरट्या ग्रामीण गावांमधून रात्र दरम्यान अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकांना अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तालुका अतिसंवेदनशील नक्षलदृष्ट्या असल्यामुळे पोलिसांना रात्री बाहेर पडता येत नाही त्याचाच फायदा तस्कर मोठ्या प्रमाणात घेत आहेत अनेकदा ग्रामीण भागातील जंगलामध्ये जनावर तस्करींच्या अड्ड्यावर जाऊन पोलिस कारवाई करण्यासाठी गेले की तस्कर गाय बैल जंगलात मोकाट सोडून देताना दिसून आले आहेत. अशा कारणामुळे तस्कर अवैध गुरांची तस्करी करण्यापासून थांबत नाहीत. त्यामुळे मुक्या जनावरांची तस्करी करणाऱ्या तस्करावर कडक कारवाई करून ही तस्करी थांबवण्यासाठी तालुक्यातील बेळगाव येथील गावकऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss