Latest Posts

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करने अनिवार्य : या तारखेपर्यंत न केल्यास होईल कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला सरकारकडून वारंवार दिला जातोय. पॅन कार्डमध्ये कोणतेही बायोमेट्रिक नसतात, त्यामुळे ते आधारशी लिंक करा असे सांगितले जाते, पण अजूनही अनेकांनी पॅन आधारशी लिंक केलेले नाही.

आता टॅक्स भरणाऱ्यांना एक शेवटची मुदत देण्यात आली आहे, त्यानुसार लवकरात लवकर करदात्यांना आपले पॅन आधारशी लिंक करावे लागणार आहे.

पॅन कार्डधारकांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्यानुसार पॅन वापरणाऱ्यांनी कालमर्यादेत त्यांचे खाते आधारशी लिंक न केल्यास कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. आयकर विभागाने म्हटलंय की जर करदात्यांनी ३१ मे २०२४ पर्यंत त्यांचे पॅन आधारशी लिंक केले तर टीडीएसच्या कपातीसाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही, पण लिंक न केल्यास मात्र कारवाई केली जाईल. आयकर नियमांनुसार, पॅन बायोमेट्रिक आधारशी लिंक नसल्यास, लागू दराच्या दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल. करदात्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत की त्यांना टीडीएस/टीसीएसच्या शॉर्ट डिडक्शन/कलेक्शन मध्ये डिफॉल्ट झाल्याच्या नोटिसा मिळत आहेत, असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBTD) म्हटले आहे.

तर बंद होऊ शकते पॅन कार्ड –
सीबीडीटीने म्हटले की ३१ मार्च २०२४ पर्यंत केलेल्या व्यवहारांसाठी आणि जिथे ३१ मे किंवा त्यापूर्वी आधारशी लिंक केल्यामुळे पॅन सक्रिय झालेल्या प्रकरणांमध्ये २०२४ मध्ये टॅक्स डिडक्ट करण्याचं बंधन राहणार नाही. एकेएम ग्लोबल, पार्टनर टॅक्स संदीप सहगल म्हणाले की या सर्क्युलरमुळे ज्या प्रकरणात करदात्याचे पॅन आधारशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय असल्याचे आढळते, त्या करदात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो.

हा आहे शेवटचा पर्याय –
ज्या प्रकरणांमध्ये कपातीसाठी करदात्यांना अशा नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, त्या करदात्यांना ३१ मे पूर्वी आधार पॅनशी लिंक करण्याचा सल्ला दिला जातो, या तरतुदीमुळे ज्यांना कमी कर भरावा लागतो, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे सहगल म्हणाले.

पॅन कार्ड चालू आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये आणि करदात्यांना यासाठी कपात करणाऱ्या डिडक्टरवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे सध्या जास्त दिलासा दिला जाऊ शकत होता, तिथे तो देण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss