Latest Posts

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसह गडचिरोलीत भाजपच्या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

– शेवटच्या समाजघटकाला मिळणार लाभ : खासदार अशोक नेते
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा भाजपच्या वतीने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ काल रविवार १७ रोजी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या योजनेचा शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रिनवर पाहण्याची सुविधा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या पोटेगांव मार्गावरील निवासस्थानी करण्यात आली होती. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सुरूवातीला खासदार अशोक नेते यांनी भगवान विश्वकर्मा, भारतमाता आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यानिमित्य १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (गांधी जयंती) या सेवा पंधरवड्यात रक्तदान, आरोग्य शिबिरे यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या नावाने सुरू होत असलेल्या या योजनेमुळे समाजातील १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार जातीतील शेवटच्या समाज घटकापर्यंतच्या लोकांचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. पारंपरिक कारागिरांच्या कलेला यातून प्रोत्साहन मिळून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक तथा पक्षाचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, एस.टी. मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, महिला प्र. जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश मांडवगडे, भाजपा जिल्हा कारागीर आघाडीजे सुधाकर पेटकर, सोनार समाजाचे अविनाश विश्रोजवार, कारागीर समाजाचे हजारे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, उपाध्यक्ष प्रणय खुणे, अनिल पोहणकर, अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, विवेक बैस, दतू माकोडे, सोमेश्वर धकाते, राकेश राचमलवार, शेरकी, लाटकर, संजय बारापात्रे, महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, जिल्हा सचिव गिता हिंगे, वैष्णवी नैताम, पुनम हेमके, अर्चना निंबोड, कोमल बारसागडे, पुष्पा करकाडे, सोशल मीडियाचे संयोजक आनंद खजांजी प्रामुख्याने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss