Latest Posts

श्रीकृष्ण मंदिरातील जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला कंकडालवार दांपत्याची उपस्थिती

–  श्रीकृष्णा मंदिरात दर्शन घेऊन केले दान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आलापल्ली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन (Organization of Janmashtami program) केले होते.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडलावार (Chairman of Market Committee Ajay Kankadlawar) व अहेरी माजी पंचायत समिती माजी उपसभापती सोनाली अजय कंकडलावार (Former Deputy Speaker Sonali Ajay Kankadlawar) यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध पुजा अर्चना करून मंदिराच्या कामासाठी व कार्यक्रमासाठी देणगी दिली. सर्व शेतकरी आणि नागरिकांवरील संकट दूर करून निसर्गाची कृपादृष्टी सर्वावर राहावी. यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

यावेळी आयोजित भजन कीर्तनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यावेळी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात मोठ्या उत्साहाने मुलांनी सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मनोज बोल्लूवार, केसनवार, बिटपल्लीवार, जल्लेवा मंथनवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss