Latest Posts

तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस असे म्हणणे पत्नीचा अपमान नाही : हायकोर्टाने केले स्पष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस असे म्हणून पतीने पत्नीचा अपमान केला आहे, असा तर्क लावला जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मराठी कुटुंबात असे ओघात म्हटले जाते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना नोंदवले.

मराठी कुटुंबात ओघाओघात असा उच्चार केला जातो. अपमान किंवा गैरवर्तन करण्याच्या उद्देशाने पतीने ठरवून पत्नीला अशा प्रकारे हिणवले असेल तर ती क्रूरता व मानसिक छळ ठरू शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. न्या. नितीन सांबरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस असे पती कधी म्हणाला याचा पुरावा पत्नीने सादर केला नाही. पती केवळ असे बोलला याचा अर्थ त्याने अपमान केला असा होत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या जोडप्याचा विवाह २४ जानेवारी २००७ रोजी झाला. काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरू झाला. अखेर पतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका केली. कुटुंब न्यायालयाने घटस्फोट नाकारला. त्याविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. पती तापट स्वभावाचा आहे. कुठे फिरायला जाण्याचा विषय काढला की, पती चिडचिड करायचा, रात्री दारू पिऊन घरी यायचा असा दावा पत्नीने केला होता.

तर पत्नीने माझ्या व कुटुंबीयांच्या विरोधात पोलिसांत का कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला. पत्नी रात्री उशिरापर्यंत पह्नवर बोलायची. तिचे संभाषण कोणासोबत सुरू होते. हे ती सांगायची नाही. ती सतत माझ्याशी वाद घालायची, असा युक्तिवाद पतीने न्यायालयात केला.

पतीविरोधात खोटी तक्रार करणे ही क्रूरताच –
न्यायालय म्हणाले, घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्यानंतर पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. ही तक्रार खोटी होती. कारण पत्नीने कुटुंब न्यायालयात दिलेल्या साक्षीत या तक्रारातील तपशील कुठेच आला नाही. अशा प्रकारे पत्नीने आधारहीन खोटी तक्रार करणे, तक्रारीचा कोणताही पुरावा न देणे ही पत्नीने केलेली क्रूरताच आहे. या आधारावर पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला जात आहे.

पत्नीने पुरावे न देणे हा पतीचा मानसिक छळ –
पतीचे विवाहबाह्य संबंध होते, हुंड्यासाठी छळ केला जात होता, गैरवर्तन केले जात होते, अपमान केला जात होता याचा पत्नीने कोणताही पुरावा सादर न करणे हे पतीला मानसिक त्रास देण्यासारखेच आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.

Latest Posts

Don't Miss