Latest Posts

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे गडचिरोली शहरात जनसंवाद यात्रा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रशेखर बावनकुळे यांचे गडचिरोली शहरात जनसंवाद यात्रा मान्यवरांच्या भेटी व कार्यकर्त्यांशी संवाद या कार्यक्रमाअंतर्गत आगमन झाले असतांना त्यांचे स्वागत करतांना लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे तसेच सोबत खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांच्या भेटी, विश्वकर्मा अंतर्गत कारागिरांच्या भेटी तसेच दिलीप खडसे (पेंटर) यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ९ वर्षातील अनेक विविध लाभाच्या योजनेची पुस्तिका देवुन संवाद साधण्यात आला.

तसेच आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेवुन महाविजय २०२४ चा विजय संकल्प घेण्यात आला.

Latest Posts

Don't Miss