विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली अहेरी तालुक्यातील पेरमीली येथील युवकांनी व आलापल्ली येथील महिलांनी केल भाजपा मध्ये प्रवेश. राणी रुक्मिणी महल येथे अनेक युवकांनी व महिलांनी भाजपा मधे प्रवेश केला.
यावेळी माजी पालकमंत्र्यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत व पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे.
पक्षप्रवेशावेळी भाजपा पेरमीली चे युवा कार्यकर्ते साई चदंनखेडे, भाजपा चे जेस्ट नेते आनंदराव रालबंडीवार, सतीश गोटमवार युवा नेता, सचीन करमे अनु जा. मोर्चा जिल्हा महामंत्री, अभिजीत शेंडे ता. महामंत्री, फ्रॅक्लीन सलम शहर अध्यक्ष, अंकुश शेंडे शहर उपाध्यक्ष, हर्षीद वर्मा शहर उपाध्यक्ष, विजया विठ्ठलानी ताई, सागर बिट्टीवार उपस्थित होते.