Latest Posts

अहेरी शहरातील इंदिरा नगर बेघर कॉलनीतील शेकडो युवक व महिलांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वाखाली केला भाजपात प्रवेश

– युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनी, प्रभाग प्रभाग क्रमांक २ आणि ४ मधील विविध पक्षातील शेकडो युवक व महिलांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम (Former Guardian Minister Raje Ambrishrao Atram) यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत काल भाजपात प्रवेश केला.

यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी बँड वाजवून रैली करीत प्रभागातील नागरिकांनी राजेंचे जोरदार स्वागत केले.अहेरी शहरात विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे. तुमचा विश्वासघात कदापी होहु देणार नाही, तुमचा प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले. राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करीत इंदिरानगर प्रभागातील नागरिकांनी राजेंना जोरदार दाद दिली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे. तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे.

यावेळी भाजपाचे अहेरी तथा आलापल्ली येतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इंदिरानगर बेघर कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss